'लूप'शी केलेला करार 'एअरटेल'नं केला रद्द

दूरसंचार क्षेत्रातली प्रमुख कंपनी भारती एअरटेलनं मुंबई ‘लूप टेलीकॉम’वर ताबा मिळवण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात केलेला 700 करोड रुपयांचा करार आपल्याकडून रद्द केलाय.

Updated: Nov 5, 2014, 04:49 PM IST
'लूप'शी केलेला करार 'एअरटेल'नं केला रद्द title=

नवी दिल्ली : दूरसंचार क्षेत्रातली प्रमुख कंपनी भारती एअरटेलनं मुंबई ‘लूप टेलीकॉम’वर ताबा मिळवण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात केलेला 700 करोड रुपयांचा करार आपल्याकडून रद्द केलाय.

एअरटेल आणि लूपमध्ये झालेल्या या हस्तांतरणाला दूरसंचार विभागानं अजूनपर्यंत मंजुरी दिलेली नाही. ज्यामुळे, कंपनीनं हे पाऊल उचललंय.

लूप मोबाईलच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून 2014 मध्ये कंपनी 700 कोटींना विकत घेण्याचा करार 'लूप'ने 'एअरटेल'शी केली होती. परंतु, ‘एअरटेल’ कंपनीनं या करारातून आपले हात वर केलेत. एअरटेल – लूप कराराला दूरसंचार विभागाने मान्यता दिलेली नाही. त्यामुळेच, एअरटेलनं हे पाऊल उचलल्याचं समजतंय. लूप आणि तिच्या उपकंपनीनं सरकारी स्पेक्ट्रम आणि इतर शुल्क असे 808 कोटी रुपये थकवल्याचं, दूरसंचार विभागानं म्हटलंय. 

मुंबई स्थित लूप मोबाइलसेवा कंपनीचा परवाना नोव्हेंबरमध्ये संपत असून त्यानंतर कंपनीला मोबाइलसेवा पुरवता येणार नाही. ही सेवा कायम ठेवण्यासाठी कंपनीला स्पेक्ट्रम विकत घेण्याची आवश्यकता होती मात्र, फेब्रुवारीमध्ये झालेल्या स्पेक्ट्रम लिलावात लूप सहभागी झालेली नव्हती. यासंदर्भात व्यावसायिक अडचणींमुळे परवान्याचे नूतनीकरण कंपनीला करता आलेले नसून 29 नोव्हेंबर 2014 नंतर सेवा बंद करावी लागणार आहे.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.