सावधान! तुम्हीही लॅपटॉप चार्जिंगला लावून काम करता

जर तुम्हीही लॅपटॉप चार्जिंगला लावून त्यावर काम करत असतील तर जरा सावधान व्हा कारण असं करणं धोकादायक ठरु शकतं. दिल्लीतील तुगलकाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लॅपटॉपवर काम करत असतांना २३ वर्षाच्या युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.

Updated: May 23, 2016, 04:20 PM IST
सावधान! तुम्हीही लॅपटॉप चार्जिंगला लावून काम करता title=

मुंबई : जर तुम्हीही लॅपटॉप चार्जिंगला लावून त्यावर काम करत असतील तर जरा सावधान व्हा कारण असं करणं धोकादायक ठरु शकतं. दिल्लीतील तुगलकाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लॅपटॉपवर काम करत असतांना २३ वर्षाच्या युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.

युवक हा एका कंपनीत मॅनेजर या पोस्टवर काम करत होता. डॉक्टरांनी सांगितलं की, रुग्णालयात येण्यापूर्वीच या युवकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी हा लॅपटॉप ताब्यात घेतला आहे आणि या बाबतची चौकशी करत आहेत.