नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध पुन्हा एकदा खेळाने सुधरवावे अशी इच्छा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने व्यक्त केली आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट मॅच व्हावी म्हणून बीसीसीआयने पुन्हा एकदा सरकारकडे धाव घेतली आहे. बीसीसीआयचे सीईओ राहुल जौहरी यांनी गृह मंत्रालयाकडे अनुमतीसाठी पत्र लिहिलं आहे.
या पत्रातून त्यांनी दुबईमध्ये भारत पाकिस्तानमध्ये तीन टेस्ट मॅच, पाच वनडे आणि दोन टी-२० मॅचच्या सीरीज व्हाव्यात अशी मागणी केली आहे.
जर मंत्रालयाने या गोष्टीला अनुमती दिली तर या वर्षाअखेरीस या दोन देशांमध्ये सीरीज होण्याची शक्यता आहे.
२०१६ मध्ये शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली पाकिस्तानसोबत एक सीरीज खेळण्याची इच्छा भारतीय संघाने दर्शविली होती, परंतू भारतावर सतत होणारे दहशतवादी हल्ले या कारणामुळे सरकारने त्यास परवानगी दिली नव्हती.