बंगळुरूत कारमध्ये बलात्कार, बसपा नेत्याच्या मुलाला अटक

बंगळुरू शहरात एका एका 22 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सहा जणांनी कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

Updated: Jul 16, 2014, 08:32 PM IST
बंगळुरूत कारमध्ये बलात्कार, बसपा नेत्याच्या मुलाला अटक title=

बंगळुरू : बंगळुरू शहरात एका एका 22 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सहा जणांनी कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

या घटनेत बसपा नेत्याच्या मुलाचाही समावेश असल्याचं सांगण्यात येतंय. 

या घटनेमुळे दिल्ली येथील बलात्काराची पुन्हा एकदा पुनरावृत्ती घडली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली असली तरी याबाबतची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. 

या तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की शुक्रवारी रात्री मित्राने मला अपार्टमेंटजवळ सोडल्यानंतर स्कोडा गाडीतून आलेल्या सहा जणांनी मला घेराव घातला. 

तेव्हा मी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, त्यापैकी एकाने मला गाडीत ओढून घेतले आणि माझ्यावर सहा जणांनी अत्याचार केला. या प्रकरणी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.