नवी दिल्ली: महाराष्ट्रामध्ये गोवंशहत्या बंदीच्या प्रस्तावावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असून गेली १९ वर्षे प्रलंबित असलेली ही मागणी भाजपाचं केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यावर पूर्ण झाली आहे. राष्ट्रपतींच्या या प्रस्तावावरील स्वाक्षरीमुळं महाराष्ट्रात गोवंशहत्याबंदीचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला आहे.
३० जानेवारी १९९६ रोजी असा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाचा शेतकऱ्यांवर तसंच कृषिक्षेत्रावर काय परिणाम होईल याबाबत अभ्यास करण्यात आला आणि त्याचंही सविस्तर सादरीकरण किरीट सोमय्या यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांनी केलं होतं.
केंद्रामध्ये भाजपाचे सरकार आलं पाठोपाठ राज्यातही भाजपाचं सरकार आलं त्यानंतर राज्यातल्या भाजपा नेत्यांनी हा मुद्दा पुन्हा हातात घेतला आणि राष्ट्रपतींकडे पाठपुरावा केला. अखेर आज सोमवारी राष्ट्रपतींनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याचं वृत्त असून त्यामुळं महाराष्ट्रात गोवंशहत्येला बंदी घालण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.