दिल्ली : आर्य चाणक्य यांना विष्णूगुप्ता किंवा कौटिल्य देखील म्हटले जात होते. प्राचीन भारताचं राजकीय आणि कुटनीती शास्त्राचा पाया त्यांनी घेतल्या. आजही चाणक्य नीतीमधील काही तत्व राजकारणात वापरली जातात.
चंद्रगुप्त मौर्य साम्राज्य उभारण्यासाठी आर्य चाणक्य यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे मौर्य साम्राज्य एक प्रभावी साम्राज्य म्हणूनही उदयास आलं.
आर्य चाणक्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. जगभर आजही चाणक्यनीतीकडे कुतूहलाने आणि आदराने पाहिले जाते. आचार्य चाणक्य हे तक्षशीलेच्या गुरुकुलात अर्थशास्त्राचे आचार्य होते.
राजकारण आणि कूटनीतीतही त्यांनी प्रचंड कार्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. त्यात नीतीशास्त्रावरील ग्रंथाचाही समावेश आहे. नीतीशास्त्रावरील ग्रंथ म्हणजेच चाणक्य नीती.