<B> <font color=red> LIVE : </font></b> अरविंद केजरीवाल यांची विश्वासदर्शक ठरावावर कसोटी

एकीकडे उत्तर भारत थंडीनं गारठला असताना दिल्लीत मात्र राजकीय वातावरण तापलंय. आज अरविंद केजरीवाल यांची खरी अग्नीपरीक्षा सुरू होतेय. आजचा विश्वासदर्शक ठराव जिंकण्याची त्यांची कसोटी लागणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 2, 2014, 04:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
एकीकडे उत्तर भारत थंडीनं गारठला असताना दिल्लीत मात्र राजकीय वातावरण तापलंय. आज अरविंद केजरीवाल यांची खरी अग्नीपरीक्षा सुरू होतेय. आजचा विश्वासदर्शक ठराव जिंकण्याची त्यांची कसोटी लागणार आहे.

पाहुयात, काय सुरू आज सकाळपासून दिल्लीत...
दुपारी १५.१० वाजता
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंह लवली यांनी काँग्रेसचा विश्वासदर्शक ठरावाला समर्थन देण्याच्या भूमिकेत असल्याचं म्हटलंय. ‘भाजपकडे सध्या पर्याय नाही... म्हणूनच गेल्या १६ वर्षात पहिल्यांदाच डॉ. हर्षवर्धन यापद्धतीनं बोलत आहेत. काँग्रेस भाजपचं दुखणं समजू शकतं’ असं त्यांनी यावेळी म्हटलंय.

दुपारी २.३० वाजता
सिसोदिया यांच्यानंतर भाजप नेते डॉक्टर हर्षवर्धन यांनी ‘आप’वर जोरदार हल्लाबोल केलाय. त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवलाय. ‘केजरीवाल अगोदर वचनं घेऊन काँग्रेसचं समर्थन घेणार नसल्याचं सांगत होते... आज ते त्याच काँग्रेसच्या साहाय्यानं सरकार बनवायला निघालेत’ असं त्यांनी यावेळी म्हटलंय.
दुपारी २.१५ वाजता
आम आदमी पार्टीचे नेते आणि मंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीमध्य विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. आम्ही इथं जनतेची सेवा करण्यासाठी आलो आहोत, आणि आम्ही सरकार बनविण्यासाठी कोणतीही तडजोड केली नाही, असं त्यांनी सांगितलंय.
दुपारी २.१० वाजता
आम आदमी पार्टीच्या टोपीला विरोधी पक्षांनी विरोध दर्शवलाय. भाजप नेते डॉक्टर हर्षवर्धन यांनी आत आणि बाहेर वेगवेगळे नियम असल्याचं म्हटलंय.
दुपारी १.०० वाजता
‘सरकार पडण्याची भीती आम्हाला नाही... आम्हाला जर सत्तेत राहायचं असतं तर आम्हाला भीती वाटली असती... दिल्लीच्या जनतेचा विश्वास आमच्यासोबत आहे...’ असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवल यांनी म्हटलंय.
दुपारी १२.२५ वाजता
सायंकाळा पाच वाजल्यानंतर विश्वासदर्शक ठरावावर मतदान होणार आहे. विश्वासदर्शक ठरावाआधी चर्चेसाठी साडे तीन तासांचा वेळ निर्धारीत करण्यात आलाय.
दुपारी १२.१५ वाजता
दुपारी २ वाजता विश्वासदर्शक ठराव मांडण्याचं ठरवण्यात आलं होतं. ‘आप’कडे २८ आमदार आहेत, त्यांना काँग्रेसकडे असलेल्या आठ आमदारांचं समर्थन मिळालंय. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसनं आपला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलाय.
सकाळी ११.४५ वाजता
सामाजिक कार्येकर्ते अण्णा हजारे यांनी, काँग्रेसनं पाठिंबा मागे घेतला तर चुकीचा संदेश जाईल, असं म्हटलंय. केजरीवाल सरकार विश्वासदर्शक मत मिळवेन, असा विश्वास अण्णांनी व्यक्त केलाय.
सकाळी १०.५० वाजता
भाजपचे स्पीकर पदाचे उमेदवार जगदीश मुखी असतील. जगदीश मुखी यांनी आपला अर्ज दाखल केलाय. भाजपचे नेते डॉ. हर्षवर्धन यांनी व्हिप लागू करून आपल्या सर्व आमदारांना ‘आप’ सरकारच्याविरुद्ध मत देण्यासाठी बजावलंय. मतदानासाठी भाजपचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.

******

मुख्यमंत्री झाल्या-झाल्या मोफत पाणी आणि स्वस्त विजेचे निर्णय घेऊन ते दिल्लीकरांच्या पसंतीला उतरलेत. मात्र त्यांचं सरकार विधानसभेच्या पसंतीला उतरणार का, याचा फैसला आज होणार आहे. केजरीवाल यांच्यासमोर आजचा विश्वासदर्शक ठराव जिंकण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
काँग्रेसनं पाठिंबा दिला असला, तरी केजरीवालांना अडचणीत आणण्याची संधी तो पक्ष सोडेल असं नाही. दुसरीकडे प्रबळ विरोधीपक्ष असलेला भाजपही आम आदमी पार्टीला खिंडीत गाठण्याची एकही संधी सोडणार नाही, हे स्पष्ट आहे. अशा स्थितीत केजरीवाल आजचा विश्वासदर्शक ठराव जिंकतात का, हे बघणं महत्त्वाचं आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.