www.24taas.com, नवी दिल्ली
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंशी फारकत घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल आज नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत.
यावेळी पक्षाची घटना, दृष्टिकोन आणि सदस्यांच्या निवडीबाबत माहिती देण्यात येईल, असं अरविंद केजरीवाल यांच्याकडून सांगण्यात आलंय. शिवाय पक्षाच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी अंतर्गत लोकपालही नियुक्त केला जाणार असून ही जबाबदारी निवृत्त न्यायाधीशांवर सोपवण्यात येईल, असे संकेत त्यांनी दिलेत. एकूण पक्षाच्या स्थापनेमुळे केजरीवाल आणि त्यांच्या टीमचा राजकारणात अधिकृत प्रवेश होणार आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय पक्षाला बाहेरुन पाठिंबा देणार असल्याचं कुमार विश्वास यांनी म्हटलयं. केजरीवाल यांच्यासाठी निवडणूक प्रचार करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय.