अरुणाचल प्रदेशातील राजकीय अस्थिरता, मुख्यमंत्री पेमा खांडूंची पक्षातून हकालपट्टी

 अरुणाचल प्रदेशातील राजकीय अस्थिरता अद्यापही कायमच आहे.. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यावर त्यांच्याच पक्षानं कारवाई करत पीपल्स पक्षातून त्यांची हकालपट्टी केलीये.. खांडूंसह उपमुख्यमंत्री चौना मे आणि अन्य पाच आमदारांना  पक्षातून तडकाफडकी निलंबित करण्यात आलंय.

Updated: Dec 30, 2016, 07:22 AM IST
अरुणाचल प्रदेशातील राजकीय अस्थिरता, मुख्यमंत्री पेमा खांडूंची पक्षातून हकालपट्टी  title=

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील राजकीय अस्थिरता अद्यापही कायमच आहे.. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यावर त्यांच्याच पक्षानं कारवाई करत पीपल्स पक्षातून त्यांची हकालपट्टी केलीये.. खांडूंसह उपमुख्यमंत्री चौना मे आणि अन्य पाच आमदारांना  पक्षातून तडकाफडकी निलंबित करण्यात आलंय.

 गेल्या वर्षभरापासून अरुणाचल प्रदेशमध्ये राजकीय उलथापालथ सुरु आहे. काँग्रेसमधील आंतर्गत वादातून आधी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राष्ट्रपती राजवटीचा निर्णय रद्दबातल ठरवला आणि प्रेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेस  पुन्हा सत्तेवर आली.. मात्र दीड ते दोन महिन्यांतच खांडूंनी 42 आमदारांसह काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये प्रवेश केला आणि सत्ता स्थापन केली.

यात खांडूंना भाजपची ही साथ मिळाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून पीपल्स पक्षात खांडूंविषयी धूसपूस वाढली होती.. काही आमदरांचा भाजपच्या सहभागाला आणि खांडू यांच्या वर्चस्वाला विरोध होता.. याच गटबाजीतून खांडूंवर कारवाई करण्यात आली आहे.