शपथ घेण्यासाठी सायकलवर पोहोचले राष्ट्रपती भवनात

मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात आज एकूण १९ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. अनेक जण वेगवेगळ्या पारंपरिक पोशाखात शपथ घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले होते.

Updated: Jul 5, 2016, 06:12 PM IST

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात आज एकूण १९ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. अनेक जण वेगवेगळ्या पारंपरिक पोशाखात शपथ घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले होते.

राजस्थानमधील बीकानेर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले अर्जुन राम मेघवाल सायकलवर राष्ट्रपती भवनात पोहोचले. 2014 मधून पहल्यांदा लोकसभेवर निवडून आलेले अर्जुन राम मेघवाल संसदेत चांगल्या कामासाठी ओळखले जातात. 

मेघवाल वेगवेगळ्या मुद्यांवर नेहमी आवाज उठवतात. त्यांच्या कामामुळे त्यांना काही दिवसांपूर्वीच चेन्नईच्या आयआयटीने खासदार महारत्न पुरस्काराने सम्मानित देखील केलं आहे. 

एक चांगला वक्ता आणि शिक्षित नेता म्हणून त्यांची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पेट्रोल वाचवण्याची मोहीम देखील सुरु केली होती. ज्यामुळे ते अनेकदा सायकलवर संसदेत देखील येतात. आज देखील ते सायकलवर मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी ते सायकलवर पोहोचले. मेघवाल राजस्थान हायकोर्टात त्यांनी ज्येष्ठ वकील म्हणूनही काम केलं आहे.