अॅपल आयफोन-६ वर बोलत असताना स्फोट

दोन दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या अॅपलच्या आयफोन-६ चा स्फोट झाल्याची घटना पुढे आली आहे. दरम्यान, ग्राहकांने याबाबत फोन सर्व्हिस सेंटरमध्ये तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्याला उडवा उडवीची उत्तरे देण्यात आलीत.

Updated: Jun 24, 2015, 11:23 PM IST
अॅपल आयफोन-६ वर बोलत असताना स्फोट title=

गुडगाव : दोन दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या अॅपलच्या आयफोन-६ चा स्फोट झाल्याची घटना पुढे आली आहे. दरम्यान, ग्राहकांने याबाबत फोन सर्व्हिस सेंटरमध्ये तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्याला उडवा उडवीची उत्तरे देण्यात आलीत.

त्यानंतर फोन धारकाने पोलिसात ठाण्यात तक्रार नोंदविली. फोनधारक बजीराबाद येथील रहिवाशी असून किशन यादव हे एक हॉटेल व्यवसायिक आहेत.

१८ जून रोडी डीएलएफ गॅलेरिच्या द मोबाईल स्टोरमधून आयफोन-६ खरेदी केला होता. ६४ जीबीच्या या फोनची किंमत ६० हजार रुपये आहे. याचे पैसे ग्राहकाने कॅशमध्ये दिले होते. दोन केवळ दोन दिवस चालला. फोनवर बोलत असताना फोनचा स्फोट झाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.