काय होती एपीजे अ्ब्दुल कलाम यांची अखेरची फेसबूक पोस्ट

भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून ओळख असलेल्या एपीजे अब्दुल कलाम हे अखेरच्या काही दिवसांमध्येही खूप अॅक्टीव होते. त्यांनी फेसबूकवर १८ जुलै रोजी आपली अखेरची पोस्ट टाकली होती. शेवटचा व्हिडिओ २२ जुलै रोजी पोस्ट केला होता. 

Updated: Jul 27, 2015, 09:15 PM IST
काय होती एपीजे अ्ब्दुल कलाम यांची अखेरची फेसबूक पोस्ट  title=

प्रशांत जाधव, मुंबई : भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून ओळख असलेल्या एपीजे अब्दुल कलाम हे अखेरच्या काही दिवसांमध्येही खूप अॅक्टीव होते. त्यांनी फेसबूकवर १८ जुलै रोजी आपली अखेरची पोस्ट टाकली होती. शेवटचा व्हिडिओ २२ जुलै रोजी पोस्ट केला होता. 

कलाम १८ जुलै रोजी आपल्या ९२ वर्षीय शिक्षकांच्या भेटीसाठी दिंडुगल येथे गेले होते. आपल्या शिक्षकाबद्दल आदर व्यक्त करताना त्यांनी फेसबूकवर काही फोटो पोस्ट केले होते. तसेच त्या फोटोवर काही कमेंटही टाकल्या होत्या. 

 

 

I just met my teacher Reverent father Chinnadurai, 92 years old at Dindugal today. He taught me nuclear physics in 1952...

Posted by "Billionbeats" on Saturday, July 18, 2015

 

पाहू या काय होती त्यांची अखेरची पोस्ट 

मी आताच माझ्या शिक्षक रेव्हरंट फादर चिन्नादुराई, (वय ९२) दिंडुगल येथे भेटलो. त्यांनी मला  १९५२ ते ५४ या कालावधीत त्रिची येथील सेंट जोसफ कॉलेज न्युक्लिअर फिजिक्स शिकवले होते. ते प्रत्येक वेळी ३ तास शिकवत असतं. ते आम्हांला अनेक पुस्तकं सजेस्ट करायचे आणि दुसऱ्या दिवशी ते आम्ही वाचले की नाही याची चाचपणी करण्यासाठी प्रश्न विचारत असे. एका महान शिक्षकाने मला शिकण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि शेअर करण्यास मदत केली. 
मी जेव्हा कधी या भागात आलो त्या वेळी मला त्यांना भेटण्याची आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याची संधी मिळाली नाही. 

कलाम 

शेवटचा व्हिडिओमध्ये डॉ. कलाम यांनी हॅपी होमची कन्सेप्ट स्पष्ट केली आहे. त्यांच्या नुसार हॅपी होम = धार्मिक घर + आनंदी आई + पारदर्शी पिता असं सूत्र त्यांनी या व्हि़डिओमध्ये दिलं आहे. 

पाहू या काय आहे तो व्हिडिओ. 

 

 

Dr Kalam’s Concept on Happy Home Yesterday, on 21st July 2012, Dr M.S. Viji and his wife Smt Sowmiya from Lexington, USA met Dr Kalam. During the discussion, Dr Kalam shared his thought on his concept of Happy Home. Dr Kalam said, Happy Home = Spiritual Home + Happy Mother + Transparent Father. In this video, Dr Kalam express his thought and views of Happy Home, which you may like to see. V PONRAJBillion Beats

Posted by "Billionbeats" on Saturday, July 21, 2012

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.