www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अरविंद केजरीवाल यांचं दुसरं नाव आहे ‘एके-४६’… होय, लवकरच दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर आरुढ होणाऱ्या ‘आम आदमी पार्टी’च्या नेत्याला हे नाव त्यांच्या चाहत्यांनी दिलंय. सोशल वेबसाईटवर एके-४६ या नावाचा सध्या बोलबाला आहे.
‘अरविंद’चा ‘A’ आणि ‘केजरीवाल’चा ‘K’... आणि ४६ यासाठी की केजरीवाल यांनी वयाची ४५ वर्ष पूर्ण करून ४६ व्या वर्षात प्रवेश केलाय. महत्त्वाचं म्हणजे, केजरीवाल यांचा जन्म जन्माष्टमीचा... यासाठी घरातल लोक त्यांना प्रेमानं ‘किशन’ या नावानंही हाक मारतात.
दिल्लीच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल सलग १५ वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या काँग्रेसच्या नेत्या शीला दीक्षित यांना धूळ चारून अरविंद केजरीवाल यांनी बाजी मारली. अरविंद केजरीवाल यांनी सध्या दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री म्हणून पदभार ग्रहण करण्याची तयारी पूर्ण केलीय.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, वयाच्या ४५ व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणारे अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरतील. तर, हेच पद याआधी सांभाळलेल्या शीला दीक्षित यांनी भारतातील सगळ्यात जास्त वेळेपर्यंत मुख्यमंत्रीपदावर आरुढ राहिलेल्या महिलेचा मान मिळणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.