बरेली : 'घरातून पळून जाणाऱ्या सर्व मुली १९ वर्षांच्याच का?' असा सवाल बरेली जिल्हा न्यायालयाने केला आहे. कारण प्रेमसंबंधातून पलायन केलेल्या १४९ युवती १९ वर्षांच्या आहेत.
या मुलींच्या वयाच्या मुद्यावरून जिल्हा न्यायालयाने हे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रेमप्रकरणातून गेल्या सहा महिन्यांपासून १४९ युवतींनी घरातून पळ काढला आहे. १४९ पैकी १४८ युवतींची वये १९ वर्षे असून, केवळ एका युवतीचे वय २४ वर्षे आहे.
पलायन करणाऱ्या १४८ मुलींचे वय एकसारखे कसे असू शकते? असा मुद्दा न्यायालयाने उपस्थित करून चौकशीचे आदेश दिले आहेत.
कायदेतज्ज्ञाने सांगितले की, घरामधून पलायन करणाऱ्या मुलींचे पालक अल्पवयीन असल्याची तक्रार पोलिसांकडे करतात.
मात्र, मुलाकडचे नातेवाईक रुग्णालयामध्ये लाच देऊन मुलगी सज्ञान असल्याचा पुरावा घेतात. यामुळे अनेकदा मुलीचे वय १९ वर्षे असल्याचा दाखला दिला जातो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.