सावधान... काश्मीर `स्वतंत्र` करायला येतोय जिहाद्यांचा गट!

दहशतवादी संघटना अल-कायदानं जाहीर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी जिहाद्यांचा एक गट अफगानिस्तानातून काश्मीरमध्ये लवकरच दाखल होणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 16, 2014, 11:29 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दहशतवादी संघटना अल-कायदानं जाहीर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी जिहाद्यांचा एक गट अफगानिस्तानातून काश्मीरमध्ये लवकरच दाखल होणार आहे. नुकताच, कारभार हाती घेतलेल्या नरेंद्र मोदी सरकारला यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. व्हिडिओमध्ये अल-कायदाच्या पाकिस्तान गटाच्या एक ज्येष्ठ सदस्य मौलना आसीम उमर आपल्या मनातलं विष ओकताना दिसतोय. या व्हिडिओमुळे भारतीय गुप्तचर संस्थांनाही खडबडून जागं केलंय.
धक्कादायक म्हणजे, या व्हिडिओमध्ये केवळ काश्मीर आणि पाकिस्तानच्या ताब्यात असणारा काश्मीरच नाही तर संपूर्ण भारत आणि पाकिस्तानच्या मुस्लिम समाजाला भारताविरुद्ध ‘जिहाद’ छेडण्याचं आवाहन केलं गेलंय. अल-कायदाच्या या व्हिडिओमध्ये दहशतवादी संघटनेच्या पाकिस्तान सेलचा सीनिअर लीडर मौलाना आसिम उमर हे वाचून दाखवताना दिसतो.
अफगाणिस्तानहून जिहाद्यांचा एक गट काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी येतोय, असं या व्हिडिओमध्ये उमर म्हणताना दिसतोय. हास्यास्पद म्हणजे, ‘द वॉर कन्टिन्यूज : अ स्टेटमेंट ऑन कश्मीर्स मुस्लिम्स’ नवाच्या या व्हिडिओमध्ये उमर धर्माचं ज्ञानही देताना दिसतोय. लोकांच्या भावना भडकावण्यासाठी या व्हिडिओत 2010 मध्ये श्रीनगरच्या रस्त्यांवर भारतीय सुरक्षा सेनेसोबत काश्मीरींच्या झालेल्या झटापटीत झालेल्या काही नागरिकांच्या मृत्यूचंही फूटेज दाखवण्यात आलंय.
‘आज संपूर्ण जगात मुसलमानांनी हत्यार उचललेत आणि जिहादमध्ये ते सहभागी होत आहेत. ज्या लोकांनी कधीही हत्यारबंद जिहादचा मार्ग पत्करला होता तेही आता निराशेमुळे शांतीपूर्ण विरोधाचा मार्ग सोडून याच रस्त्यावर चालू लागलेत’ असं आसिम उमर म्हणतोय. या व्हिडिओत मुस्लिम बहूल अशा अफगाणिस्तान, सीरिया, इराक, अल्जिरिया आणि जगातील इतर देशांचा उल्लेख केला गेलाय.
अल-कायदानं या व्हिडिओत मुस्लिमांना युरोपवर हल्ला करण्यासाठी आणि गेल्या वर्षी लंडनमध्ये ली रिग्बीच्या खूनासारख्या घटना घडवून आणण्याचं आवाहन केलंय. इंग्लंडनं कायमच अल-कायदाचा उघडपणे विरोध केलाय. सीरिया विद्रोहींच्या नावावर जे धोकादायक सदस्य लढताना दिसतायत ते जबहात अल नुसरत संघटनेचे सदस्य आहेत जे अल-कायदाशीही जोडलेले आहेत, अशी सूचना रशियानं इंग्लंडला दिलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.