अखिलेश यादव यांच्या प्रचाराला आजपासून प्रारंभ

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आजपासून राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ करणार आहेत. 

Updated: Jan 24, 2017, 07:51 AM IST
अखिलेश यादव यांच्या प्रचाराला आजपासून प्रारंभ title=

लखनऊ : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आजपासून राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ करणार आहेत. 

आज अखिलेश यादव यांची पहिली प्रचार सभा सुलतानपूरमध्ये घेणार आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याचा निर्णय घेतल्यावर अखिलेश प्रथमच जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे ते या समभेत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

दरम्यान उत्तर प्रदेशात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणाऱे अखिलेश यादव एकूण 14 संयुक्त सभा घेणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.