नवी दिल्ली : जिओकडून वाढत्या कॉम्पिटिशनला थोपविण्यासाठी एअरटेलने नवी रणनिती आखली आहे. आता एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी नवी प्लान बाजारात आणला आहे.
टेलीकॉम सर्विस प्रोव्हाइडर भारती एअरटेलने घोषणा केली की, दुसऱ्या कोणत्याही सर्व्हिस प्रोवाइडकडून एअरटेल ४६ वर येणाऱ्या ग्राहकाला मोफत डाटा देण्यात येणार आहे.
यानुसार १२ महिन्यांपर्यंत ३ जीबी डेटा फ्री देण्यात येणार आहे. एअर टेलीची ही सुविधा प्री-पेड आणि पोस्ट पेड ग्राहकांसाठी असणार आहे.
प्री पेड ऑफर अंतर्गत ३४५ रुपयांच्या पॅकमध्ये मोफत लोकल आणि एसटीडी कॉल सह ३ जीबी डाटासह एकूण ४ जीबी डाटा मिळणार आहे.
नवीन योजना ४ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत मिळणार आहे. या योजनेत ग्राहकांना ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत फ्री डेटा मिळणार आहे. तसेच एअरटेलचे सध्याचे ग्राहक ४ जी अपग्रेड केल्यास त्यांना मोफत डाटा मिळणार आहे.