जिओनंतर एअरसेलची फ्री ऑफर

एअरसेलने या सण आणि सुट्ट्यांच्या दिवसांत आपल्या ग्राहकांना मोफत सेवा देऊ करण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: Mar 10, 2017, 05:36 PM IST
जिओनंतर एअरसेलची फ्री ऑफर  title=

नवी दिल्ली : एअरसेलने या सण आणि सुट्ट्यांच्या दिवसांत आपल्या ग्राहकांना मोफत सेवा देऊ करण्याचा निर्णय घेतलाय. 

त्यांच्या 'इंक्रेडिबल ऑफर'मध्ये ग्राहकांना मोफत डेटा, मोफत रोमिंग आणि स्वस्त कॉल रेट्स मिळणार आहेत. 

कंपनीने एका पत्रकातून स्पष्ट केलं की ,'ग्राहकांना आपल्या ८३ रुपयांच्या पहिल्या रिचार्जमध्ये पुर्ण टॉक टाईम , कमी कॉल रेट्स, ३ महिन्यांची वैधता तसंच रोमिंगमध्ये फ्री इनकमिंग अशा अनेक ऑफर्स मिळणार आहेत. 

कंपनीचे प्रमुख मार्केटींग अधिकारी अनुपम वासुदेव म्हणाले की, 'सण आणि उत्सवांच्यानिमित्ताने  एअरसेल आपल्या नवीन ग्राहकांना पुन्हा एकदा खास ऑफर्स देऊ करतेय. यातून आम्ही आमचा आनंद त्यांच्यासोबत साजरा करतोय. ही सवलत लोकांना त्यांच्या संपर्क व दळणवळणविषयक गरजा स्वस्तात पुर्ण करण्याचं स्वातंत्र्य देते.