Aircelची फ्री डेटा ऑफर लॉन्च

एअरसेल लवकर फ्री व्हाईस कॉल देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यासाठी कंपनीची चाचपणी सुरू आहे.

Updated: Dec 5, 2016, 10:25 PM IST
Aircelची फ्री डेटा ऑफर लॉन्च title=

नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या शानदार ऑफरनंतर आता मोबाईल कंपन्यांमध्ये ऑफरचं युद्ध सुरू झालं आहे. एकापेक्षा एक आकर्षक ऑफर ग्राहकांसमोर ठेवले जात आहेत. 

एअरसेल लवकर फ्री व्हाईस कॉल देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यासाठी कंपनीची चाचपणी सुरू आहे.

एअरसेलने दिल्लीत ९० दिवसांच्या व्हॅलिडीटीवर एफआरसी १४८ लॉन्च केला आहे. यानुसार १४९ रूपयाच्या पहिल्या रिचार्जवर ९० दिवसांसाठी एअरसेल टू एअरसेल एसटीडी आणि लोकल फ्री देण्यात आला आहे. 

तसेच १५ हजार सेकंद प्रति महिने एअरसेलहून इतर ऑपरेटर्स फ्री लोकल आणि एसटीडी कॉल्सची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच अनलिमिटेड २ जी डेटा देखील एअरसेल देणार आहे. ही ऑफर मात्र नव्या कस्टमर्ससाठी आहे.

ग्राहकांना येणाऱ्या महिन्यात एफआरसी १४८ ऑफरचा अनलिमिटेड फायदा घेण्यासाठी पहिल्या महिन्यात ५० रूपयांचा रिचार्ज करणे आवश्यक आहे.