घरगुतीसह परदेशी विमान प्रवासही स्वस्त, एअर एशियाची बंपर ऑफर

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आबे. एअर एशिया या विमान कंपनीनं सणासुदींच्या दिवसानिमित्त खास बंपर ऑफर आणलीय. कंपनीनं घरगुती आणि परदेशी दोन्ही विमान प्रवासासाठी जबरदस्त ऑफर दिलीय.

Updated: Oct 19, 2015, 08:15 PM IST
घरगुतीसह परदेशी विमान प्रवासही स्वस्त, एअर एशियाची बंपर ऑफर title=

बंगळुरू: विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आबे. एअर एशिया या विमान कंपनीनं सणासुदींच्या दिवसानिमित्त खास बंपर ऑफर आणलीय. कंपनीनं घरगुती आणि परदेशी दोन्ही विमान प्रवासासाठी जबरदस्त ऑफर दिलीय.

एअर एशियानं घरगुती विमान प्रवासासाठी कमीतकमी १२९९ रुपये आणि कुआललंपूर किंवा बँकॉकला जाण्यासाठी कमीतकमी भाडं ४,४९९ आणि ४९९९ रुपये इतकं ठेण्याची घोषणा केलीय.

या ऑफर अंतर्गत आपण १ मार्च ते २९ ऑक्टोबर २०१६पर्यंत प्रवास करू शकता. तर यासाठीची तिकीट खरेदी १९ ऑक्टोबरपासून २५ ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे. तिकीट खरेदी आपण एअर एशिया डॉट कॉम, आयफोन आणि अँड्रॉइडच्या एअर एशियाच्या मोबाईल अॅपवरूनही करू शकतो.

एअर एशिया इंडियाचे सीईओ आणि एमडी मिट्टू चांडिल्य यांनी सांगितलं की, कमी पैशात विमान प्रवास देण्यासाठी सर्वात पुढे असलेली कंपनी एअर एशिया लोकांचं स्वप्न पूर्ण करू इच्छिते. मिट्टू यांनी सांगितलं की, आम्हाला आशा आहे की, लोकं ही ऑफर पसंत करतील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.