नवी दिल्ली: एअरलाइन्स कंपनी एअर एशिया इंडिया आता दिल्लीहून प्रवास करण्यास तयार झाली आहे. एअर एशियानं देशाच्या राजधानीत आपले पंख पसरवण्याची घोषणा केली आहे.
एअर एशिया नवी दिल्लीला बेंगळुरू, गुवाहाटी, गोवा या शहरांशी जोडणार आहे. ही उड्डानं २१ मेपासून सुरू होणार आहेत.
एअर एशिया कंपनीनं प्रवाशांना आकर्षक ऑफर देण्याचीही तयारी केली आहे. कंपनीनं दिल्ली-गुवाहाटीचे किमान भाडे १५०० रुपये ठेवले आहे. तसंच दिल्ली-गोवा आणि दिल्ली-बेंगलुरूसाठी १७०० रूपये भाडे निश्चीत करण्यात आलं आहे.
एअरएशिया इंडिया १ रुपये प्रति किलोमीटरच्या दरानं विमान प्रवासाची ऑफर देत आहे. या ऑफरची बुकिंग २६ एप्रिलपर्यंत होणार आहे. या ऑफरद्वारे प्रवास २१ मे ते ३१ मे दरम्यान होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.