www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
एअर इंडियाच्या ताफ्यातील आंतरराष्ट्रीय विमान सेवा ‘ड्रिमलायनर’ची उड्डाणे पुढील आठवड्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. ड्रिमलायनर ७८७ या बोईंग विमानाची उड्डाने गेल्या चार महिन्यांपासून बॅटरीत झालेल्या बिघाडामुळे बंद करण्यात आली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, ड्रीमलायनरची राष्ट्रीय उड्डाणं या आठवड्यात सुरू होतील तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांना मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरूवात होऊ शकेल. त्यासोबतच एअर इंडिया प्रबंधनने त्यांच्या १४ विमानांपैकी पाच लीज विमाने बदलण्याचा विचार केलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
ही लीज विमाने २० - २२ वर्ष जुनी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ही लीज विमाने लीज कंपनींना परत करण्यात येणार आहेत, तर एअर इंडियाचे मालकी हक्क असलेली विमाने हळू-हळू काढून टाकण्याचा एअर इंडियाने निर्णय घेतला आहे.