माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही : सोनिया गांधी

इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर लाचखोरी प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्पष्टीकरण दिलंय. 

Updated: Apr 27, 2016, 03:23 PM IST
माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही : सोनिया गांधी title=

नवी दिल्ली : इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर लाचखोरी प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्पष्टीकरण दिलंय. माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही. आणि मी कोणाला घाबरत नाही. त्यांना माझं नाव थेट घेऊ द्या. असंही त्यांनी म्हटलंय. 

त्याचप्रमाणे दोन वर्षांपासून सत्तेत असलेलं भाजप सरकार निष्पक्ष चौकशी का करत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर लाचखोरी प्रकरणावरुन राज्यसभेत गदारोळ झाला. हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी इटलीमधल्या एका खटल्याच्या निकालामध्ये सोनियांसह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सोनियांचे सल्लागार अहमद पटेल, ऑस्कर फर्नांडिस यांची नावं आलीयेत. हाच मुद्दा राज्यसभेत उपस्थित झाला.

यावेळी भाजप खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी या प्रकरणी सोनिया गांधींचं नाव घेतल्यानं काँग्रेस सदस्य चांगलेच आक्रमक झाले. काँग्रेस खासदारांनी व्हेलमध्ये येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केलीय.. यामुळं राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. तत्पू्र्वी पंतप्रधान मोदी आणि इटलीचे पंतप्रधान यांच्यात कोणती चर्चा झाली असा सवाल राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आजाद यांनी उपस्थित केला. मात्र अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं अरुण जेटली यांनी स्पष्ट केलंय.