४०० वर्षांनंतर महिला आणि दलितांना मंदिराचे दरवाजे खुले

डेहरादून : गेली ४०० वर्षे प्रथा आणि परंपरेच्या नावाखाली ज्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता त्या दलितांना आणि महिलांना आता उत्तराखंडातील गढवाल इथल्या परशुराम मंदिरात प्रवेश यापुढे खुला होणार आहे.  

Updated: Jan 16, 2016, 05:13 PM IST
४०० वर्षांनंतर महिला आणि दलितांना मंदिराचे दरवाजे खुले title=
डेहरादून : गेली ४०० वर्षे प्रथा आणि परंपरेच्या नावाखाली ज्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता त्या दलितांना आणि महिलांना आता उत्तराखंडातील गढवाल इथल्या परशुराम मंदिरात प्रवेश यापुढे खुला होणार आहे.  
मंदिर प्रशासनाने नुकताच यासंबंधीचा एक निर्णय घेतला. 'बदलत्या काळासोबत बदलले पाहिजे; म्हणून यापुढे सर्वांचे मंदिरात स्वागत केले जाईल', असं कारण मंदिर प्रशासनाने दिलंय. यापुढे एक पाऊल टाकत आता मंदिरात कोणत्याही प्रकारचा पशू बळी दिला जाणार नसल्याची घोषणाही करण्यात आली आहे.

अनेक दलित संघटना यासाठी गेली अनेक वर्षे लढा देत होत्या. याच परीसरात आजही अनेक मंदिरे आहेत जिथे दलितांना प्रवेश नाकारला जातो, तिथेही लढा सुरू राहील असं दलित संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटलंय.

केरळमधील शबरीमाला मंदिरात मासिक पाळी सुरू असणाऱ्या महिलांना प्रवेश नाकारण्यावरून सुरू असलेल्या वादामुळे या निर्णयाला महत्त्व आले आहे