www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्लीचे अब्जाधिश नेता दीपक भारद्वाज यांच्या हत्येचा सुगावा अजून लागला नाही. या प्रकरणात आता सोनिया या एका मुलीचे नाव समोर आले आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनियाचे भारद्वाज यांच्याशी अवैध संबध होती. याची माहिती भारद्वाज यांच्या कुटुंबियांनाही होती. त्यामुळे भारद्वाज यांच्या कुटुंबात तणावाचे वातावरण होते. सोनियामुळे भारद्वाज यांची हत्या झाल्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राजौरी गार्डनमध्ये राहणाऱ्या २८ वर्षाच्य सोनियाचे भारद्वाज यांच्याशी अफेअर सुरू होते. सोनिया भारद्वाज यांच्यापेक्षा ३३ वर्षांनी छोटी होती. त्यामुळे भारद्वाज यांच्या कुटुंबियांनी त्याच्यापासून संबंध तोडले होते.
सोनिया ही मूळची कानपूरची ती गेल्या काही वर्षांपासून भारद्वाज यांच्यासह काम करत होती. भारद्वाज यांच्या फॉर्म हाऊस आणि रिसॉर्टमध्ये लग्न समारंभ व्हायचे यातील ५० टक्के हिस्सा सोनियाकडे जात असे, अशी माहिती भारद्वाज यांच्या मुलाने पोलिसांना सांगितले.