धक्कादायक ! शहरात युवतींचे गर्भपाताचे प्रमाण सर्वाधिक

सरकारी आरोग्य खात्याने केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतात शहरी भागात २० वर्षांच्या आतील युवतींचे गर्भपाताचे प्रमाण सर्वधिक आहे.

Updated: Apr 13, 2016, 11:35 PM IST
धक्कादायक ! शहरात युवतींचे गर्भपाताचे प्रमाण सर्वाधिक title=

नवी दिल्ली : सरकारी आरोग्य खात्याने केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतात शहरी भागात २० वर्षांच्या आतील युवतींचे गर्भपाताचे प्रमाण सर्वधिक आहे.

शहरी भागात होणाऱ्या गर्भपातांमध्ये १४ टक्के गर्भपात हा २० वर्षांखालील युवतींकडून होत आहे, अशी माहिती सर्व्हेक्षणातून पुढे आली आहे. देशामध्ये २० वर्षांखालील युवतींकडून गर्भपाताचे प्रमाण २१ टक्के एवढे आहे. शहरी भागातील युवती विवाहापूर्वीच गर्भपात करत असल्याची माहिती पुढे आली आहे. 

गरोदर राहणाऱ्या महिलांपैकी ग्रामीण भागात ७७ टक्के, तर शहरी भागात ७४ टक्के महिला बालकांना जन्म देतात. ग्रामीण भागात २ टक्के तर शहरी भागात ३ टक्के एवढे गर्भपाताचे प्रमाण आहे. 

१५ ते ४९ वयोगटातील गर्भपाताचे प्रमाण ९.६ टक्के एवढे आहे. ग्रामीण भागातील ५६ टक्के मुलांचा जन्म सरकारी रुग्णालयात तर २४ टक्के मुलांचा जन्म खासगी रुग्णालयात होत आहे. 
शहरामध्ये ४२ टक्के मुलांचा जन्म सरकारी रुग्णालयात, तर ४८ टक्के मुलांचा जन्म खासगी रुग्णालयात होत आहे, अशीही माहिती पुढे आली आहे.