अभिषेक बच्चनचा क्लार्क पदाच्या भरतीसाठी अर्ज...

सरकारी कामात किती निष्काळजीपणा केला जाऊ शकतं, याचं एक धक्कादायक उदाहरण समोर येतंय. 

Updated: May 3, 2017, 09:01 AM IST
अभिषेक बच्चनचा क्लार्क पदाच्या भरतीसाठी अर्ज...   title=

नवी दिल्ली : सरकारी कामात किती निष्काळजीपणा केला जाऊ शकतं, याचं एक धक्कादायक उदाहरण समोर येतंय. 

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्या नावानं एक अॅडमिट कार्ड निघालंय... यामध्ये त्यानं 'स्टाफ सिलेक्शन कमिशन'च्या परिक्षेत क्लार्क पदासाठी अर्ज केलेला दिसतोय. या कार्डावर अभिषेकचा सुटा-बुटातला फोटोदेखील आहे. 


अभिषेकचा अर्ज

गेल्या रविवारी 'मल्टी टास्कींग नॉन टेक्निकल स्टाफ'च्या पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती... यासाठी अभिषेकही क्लार्क पदाच्या अर्ज करताना दिसला. 

या कार्डावर त्याचा रोल नंबर २४०५२८३६११ लिहिला गेलाय तर त्याची जन्मतारीख १ जानेवारी १९९५ लिहिण्यात आलीय. फोटोखाली असलेल्या स्वाक्षरीमध्ये अभिशेखर बच्चन अशी सही करण्यात आलीय. या कार्डावर अभिषेकचा उल्लेख 'महिला' असा करण्यात आलाय... तसंच तो लातूरचा रहिवासी असल्याचंही दाखवण्यात आलंय. हे अॅडमिट कार्ड बोगस असल्याचं दिसून येतंय.