सरकार चालवणं म्हणजे चंद्रावर जाण्यासारखं नाही- केजरीवाल

तेरा दिवसांपासून सरकारविना असलेल्या दिल्लीत आता सरकार स्थापनेचे संकेत मिळू लागलेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार स्थापनेचे निर्देश देण्यात आलेत. दुसरीकडे `आप`च्या उत्तरासाठी दोन दिवस राहिलेत. याविषयी आपनं दिल्लीकरांकडे एसएमएसच्या माध्यमातून प्रतिक्रिया मागितल्या आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 21, 2013, 02:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
तेरा दिवसांपासून सरकारविना असलेल्या दिल्लीत आता सरकार स्थापनेचे संकेत मिळू लागलेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार स्थापनेचे निर्देश देण्यात आलेत. दुसरीकडे `आप`च्या उत्तरासाठी दोन दिवस राहिलेत. याविषयी आपनं दिल्लीकरांकडे एसएमएसच्या माध्यमातून प्रतिक्रिया मागितल्या आहेत.
सरकार स्थापनेबाबत आम आदमी पक्षानं जनतेकडून प्रतिक्रिया मागितल्या आहेत. दुसरीकडे तेरा दिवसांपासून दिल्लीत सरकार नसल्यानं भाजप आणि डाव्यांनी आम आदमी पक्षावर टीका केलीय. तर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवालांनी भाजप आणि काँग्रेसवर टीका करत म्हटलं, सरकार चालवणं म्हणजे काही चंद्रावर जाण्यासारखं नाही. आम्ही सरकार स्थापन करुन विरोधकांना चोख उत्तर देऊ.
काँग्रेस आणि भाजप पेक्षा आम्ही खूप चांगलं काम करुन दाखवू असंही केजरीवाल म्हणाले आहेत. सध्या मतदारांकडून त्यांचं मत मागविल्या जात आहे. ते पूर्ण झालं की, आप सरकार स्थापनेबाबत स्पष्ट तो निर्णय घेईल, असं केजरीवाल म्हणाले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.