नवी दिल्ली : नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आधार कार्डच्या माध्यमातून आता सर्व व्यवहार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. डेबिट आणि क्रेडिटची जागा आधार कार्ड घेणार आहे. मात्र, तुमच्याजवळ आधार नंबर हवा. याच्यामाध्यमातून शॉपिंग करु शकणार आहात.
तुमचे आधार कार्ड लवकरच तुमचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड होणार आहेत. गोंधळून जाऊ नका. नीती आयोगानं देशाची अर्थव्यवस्था कॅशलेस करण्याच्या दृष्टीने लवकरचं एक नवी प्रणाली विकसित करण्याची तयारी सुरू केली आहे. तुमच्या 12 आकडी आधार नंबरच्या सहाय्यानं सगळे आर्थिक व्यवहार नव्या प्रणालीत करता येतील. तुमची बँक खाती आधार क्रमांकाशी जोडली जातील. नव्या प्रणालीत ग्राहकांना कार्ड आणि पीन नंबर लक्षात ठेवण्याची गरज उरणार नाही.
तसचे नव्या प्रमाणातील स्मार्ट फोनवर आधार नंबर आणि बोटाच्या ठशांच्या वापर करून पैशाचे व्यवहार करता येणार आहेत. केंद्र सरकार डीजिटल पेमेंट अधिक मजबूत करण्यासाठी नीति आयोग हे महत्वाचे पाऊल उचलत आहे. त्यामुळे लवकरच आधार कार्डच्या माध्यमातून सर्व व्यवहार करु शकता.