जेव्हा कलाम यांनी राष्ट्रपतींच्या खुर्चीत बसण्यास दिला नकार

एका कार्यक्रमाच्यावेळी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या खुर्चीत बसण्यास नकार दिला. कारण ही खुर्ची अन्य खुर्चींच्या आकारापेक्षा मोठी होती.

Updated: Jul 28, 2015, 04:27 PM IST
जेव्हा कलाम यांनी राष्ट्रपतींच्या खुर्चीत बसण्यास दिला नकार title=

नवी दिल्ली : एका कार्यक्रमाच्यावेळी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या खुर्चीत बसण्यास नकार दिला. कारण ही खुर्ची अन्य खुर्चींच्या आकारापेक्षा मोठी होती.

डॉ. कलाम यांच्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्यांनी एकदा चक्क सॉरीही म्हटलेय. कलाम हे लहानथोरांपर्यंत अत्यंत लोकप्रिय होते. त्यांची साधी राहणी लोकांना भावत होती. त्यांनी देशाला एक नवी दिशा दिली. ते मिसाइल मॅन म्हणून ओळखले जातात. तसेच ते सार्वजनिक जीवनात लोकप्रिय होते.

आयआयटी (बीएचयू ) बनारस येथील एका कार्य़क्रमात मंचावर पाच खुर्ची ठेवण्यात आले होते. यातील एक खुर्ची राष्ट्रपती यांच्यासाठी ठेवण्यात आली होती. अन्य खुर्ची अधिकाऱ्यांसाठी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, राष्ट्रपतींसाठी ठेवण्यात आलेली खुर्ची मोठी होती. त्यामुळे डॉ. कलाम यांनी या खुर्चीत बसण्यास नकार दिला. शिवाय या खुर्चीत त्यांनी कुलपती यांना बसण्याची विनंती केली. ते लगेच त्या खुर्चीत बसले. त्यानंतर डॉ. कलाम यांच्यासाठी दुसरी खुर्ची मागविण्यात आली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.