कर्ज फेडू न शकल्याने त्याने १४ वर्षांपासून गाडीला बनवले घर

मंगळुरू : कर्नाटकात एक व्यक्ती गेली १४ वर्षे जंगलात त्याच्या गाडीतच राहातेय.

Updated: Feb 1, 2016, 12:10 PM IST
कर्ज फेडू न शकल्याने त्याने १४ वर्षांपासून गाडीला बनवले घर title=

मंगळुरू : कर्नाटकात एक व्यक्ती गेली १४ वर्षे जंगलात त्याच्या गाडीतच राहातेय. चंद्रशेखर गौडा असं या व्यक्तीचे नाव आहे.

गौडा यांनी नेल्लुरू केमराजे कोऑपरेटीव्ह सोसायटीकडून ५०,४०० रुपयांचे कर्ज घेतले होते. पण, काही कारणास्तव ते कर्ज फेडणे त्यांना अशक्य झाले. म्हणून या सोसायटीने २००२ साली त्याच्या मालकीच्या २.२९ एकर जमिनीचा लिलाव केला आणि रक्कम वसूल केली. यामुळे गौडा बेघर झाले.

त्यांनी एक सेकंड हँड गाडी विकत घेतली आणि गावाजवळील जंगलात नेऊन तिला आपले घर बनवले. तेव्हापासून ते आठवड्यातील एक दिवस त्या जंगलातून २१ किलोमीटर दूर चालत जातात आणि टोपल्या तयार करण्यासाठी बांबू विकत आणतात. या टोपल्या विकून ते आपला उदरर्निर्वाह करतात.

गौडा यांची ही कहाणी एका वृत्तवाहिनीवर प्रसारित झाल्यापासून दक्षिण कन्नडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.