ऐन प्रजासत्ताक दिनी मणीपूर बॉम्बस्फोटांनी हादरलं

मणीपूरची राजधानी इन्फाळमध्ये आज सकाळी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू असताना दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले. बॉम्ब स्फोटांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ९ जण जखमी झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिलीय.

Updated: Jan 26, 2014, 03:31 PM IST

www.24taas.com झी मीडिया , इन्फाळ
मणीपूरची राजधानी इन्फाळमध्ये आज सकाळी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू असताना दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले. बॉम्ब स्फोटांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ९ जण जखमी झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिलीय.
इन्फाळ पश्चिम उपायुक्तांच्या कार्यालयाजवळ बाबुपुरा भागात पहिला स्फोट झाला. बाबुपुरा भाग हा मणीपूरमधील व्हीआयपी परिसर म्हणून ओळखला जातो. इथून जवळच असलेल्या बाजारात दुसरा स्फोट झाला. कांगला ह्या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचं संचलन सुरू असताना हे स्फोट झाले. कांगला हे ठिकाण स्फोट झालेल्या ठिकाणाहून केवळ ५०० मीटर अंतरावर आहे. सध्या अर्ध सैनिक दलाला आणि पोलिसांना तिथं तैनात करण्यात आलं असल्याचं समजतंय .
मणीपूरचे १९४९ मध्ये भारतीय संघराज्यात विलिनीकरण केल्यामुळं प्रजासत्ताक दिनावर बहिष्काराचं आवाहन दहशतवादी संघटनांनी केलं होतं. युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट, पिपल्स रिव्होल्यूशनरी पार्टी, कांगलेईपाक, कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टी , कांगलेईपाक योवल कान लूप ह्या प्रमुख दहशतवादी संघटनांचा यात सामावेश आहे. दहशतवाद्यांकड्न झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमिवर पोलिसांना तैनात करण्यात आलं असून बॉम्बशोधक पथक कसून तपासणी करत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.