www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
६५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या ऐतिहासिक राजपथावर ध्वजारोहण आणि त्यानंतर भव्य परेडचं आयोजन करण्यात आलं. पंतप्रधानांच्या हस्ते इंडिया गेट इथल्या अमर जवान ज्योतीला मानवंदना देण्यात आली आणि त्यानंतर परेडला सुरूवात झाली.
परेडदरम्यान भारतीय सामर्थ्यांचं दर्शन साऱ्या जगापुढं दाखवलं गेलं. यंदा परेडचं खास आकर्षण ठरलं ते म्हणजे लढाऊ तेजस विमान... याशिवाय एमबीटी अर्जुन, अस्त्र आणि हेलिना नावाचे अण्वस्त्र तसंच टी-९० भीष्म यांनीही सा-यांचं लक्ष वेधून घेतलं...
परेडनंतर देशाच्या विविध भागातील संस्कृतीचं दर्शन घडविणाऱ्या चित्ररथांनी साऱ्यांचं लक्ष वेधलं यंदा या परेडमध्ये १८ राज्ये आपली संस्कृती, कला, ऐतिहासिक ठेवा आणि प्रगतीचे दर्शन या चित्ररथांमधून घडवलं.. त्यानंतर झालेल्या भारतीय सैन्याच्या चित्त थरारक कवायतींनी कार्यक्रमाची सांगता झाली.. यंदा परेडसाठी प्रमुख अतिथी म्हणून जपानचे पंतप्रधान शिंजो यांनी उपस्थीती लावली...
राजपथावर आम्ही हाव जातीचे कोली हे सूरही घुमले... महाराष्ट्राच्या वतीने यंदा नारळी पौर्णिमेचा सण चित्ररथाच्या माध्यमातून सादर करण्यात आला... राज्याला लाभलेला सातशे किमीचा सागरी किनारा, मासेमारी आणि नारळी पौर्णिमा सणाचे वैशिष्ट्य या चित्ररथातून मांडण्यात आलं... जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या बावीस कलाकारांनी हा चित्ररथ साकारलाय.. राजपथावर कोळीनृत्याची खास झलक पहाताना केंद्रीय गृहमंत्र्यांचाही उर भरून आला..
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.