नवी दिल्ली: एक जानेवारी 2016 पासून लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगाचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच होणार आहे. पुढच्या दोन महिन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांचा वाढीव वेतन मिळू शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सचिवांची अधिकार प्राप्त समूह सॅलरी आणि पेंशनबाबत वेतन आयोगाच्या प्रस्तावाबाबत लवकरच सहमती होऊ शकते, असंही बोललं जात आहे.
जर सातवं वेतन आयोग लागू झालं तर याचा फायदा 47 लाख कर्मचारी आणि पेंशन घेणाऱ्या 52 लाख जणांना होणार आहे. तसंच यामुळे सरकारी तिजोरीवर 1.02 लाख कोटींचा भार पडणार आहे.