तेलंगणात उष्माघातामुळे ६६ जणांचा मृत्यू

तेलंगाणातील तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे आहे.

Updated: Apr 7, 2016, 07:31 PM IST
तेलंगणात उष्माघातामुळे ६६ जणांचा मृत्यू title=

हैदराबाद : तेलंगणात उष्माघातामुळे ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. हा १० दिवसातील आठवड्यातील आकडा असल्याचं सध्या तरी सांगण्यात येत आहे. तेलंगाणातील तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे आहे.

मेहबूबनगर जिल्ह्यात २८, मेडकमध्ये ११, निजामाबाद ७, खमान आणि करीमनगरमध्ये प्रत्येकी ५ जण उष्माघातामुळे मृत्युमुखी पडले आहेत, अशी माहिती तेलंगणाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

अनेक राज्यांमध्ये मागील काही महिन्यांत तापमानात वाढ झाली आहे, त्यामुळे सर्वांत जास्त हानी तेलंगणामध्ये झाल्याचे निदर्शनास आले आहे.