www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली
तुम्ही कधी विमानाने प्रवास केला नसेल तर ते कमी पैशात शक्य आहे. केवळ ५०० रूपयांत विमान भरारी घेऊ शकता. टाटा समूहासोबत हवाई क्षेत्रात पाऊल टाकलेल्या एअर एशिया या विमान कंपनीने भारतातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ५०० रूपयात अनोखी स्कीम अंमलात आणण्याचे ठरवले आहे. त्यामुळे तुम्ही रेल्वेच्या एसी तिकीट दरात म्हणजे ५०० रूपयांत विमान प्रवास करू शकता.
सिंगापूरमधील एअर एशिया या विमान कंपनीला पाच वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने ग्राहकांसाठी ही स्कीम आणली आहे. त्यामुळे तुम्हाला ५०० रूपयात एका साईडचा प्रवास करता येणार आहे. तसेच प्रथम दर्जा आणि बिझनेस क्लासमधील ग्राहकांसाठीही १२.५ टक्के सूट देण्याचे कंपनीची योजना आहे.
कंपनीच्या या स्कीमचा लाभ घेणा-या ग्राहकाला १ डिसेंबर २०१३ पर्यंत ५०० रुपयांचा भरणा करून एका साईडचे तिकिट बुक करावे लागेल. या स्कीमअंतर्गत एअर एशिया विमान कंपनीने ३० लाख तिकिट बुक करण्याची योजना आखली आहे. एअर एशिया कंपनीचे कार्यालय असलेल्या चेन्नई येथून या स्कीमची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, ५ मे २०१४ आणि ३१ मे २०१५ या दरम्यान फ्री सीट उपलब्ध आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.