नवी दिल्ली : काळ्या पैशावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे सर्वत्र कौतुक होत आहे. ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून रद्द करत असल्याच्या घोषणेनंतर एकच कल्लोळ उडाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाच्या घोषणेनंतर लगेचच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि अर्थ मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेतली आणि नोटा रद्द करण्याची गरज का होती हे पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा गुरूवारपासून चलनात येतील, अशी घोषणा आर्थिक व्यवहार सचिव शशिकांत दास यांनी केली.
मोदींच्या या निर्णयाने गरीब जनतेला आनंद झालाय मात्र दुसरीकडे काळे धन बाळगलेल्यांचे धाबे चांगलेच दणाणलेत. त्यातही बँका आज बंद राहणार आहे.