केंद्रीय मंत्रिमंडळातून ५ मंत्र्यांना डच्चू

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारात १९ जणांना स्थान देण्यात आलेय. तर दुसरीकडे पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलाय.

Updated: Jul 5, 2016, 12:42 PM IST
केंद्रीय मंत्रिमंडळातून ५ मंत्र्यांना डच्चू title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारात १९ जणांना स्थान देण्यात आलेय. तर दुसरीकडे पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलाय.

निहालचंद, राम शंकर कठारिया, सांवरलाल जाट, मनसुखभाई डी वसावा आणि एम.के.कुंदारिया यांची गच्छंती करण्यात आलीये.

मंत्रिमंडळ विस्तारात पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळालीय. तर बाकीच्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.