सुरक्षा दलाकडून पाच जिवंत बॉम्ब निकामी

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील मंडी परिसरातील अझमबाद गावात रविवारी पाच जिवंत बॉम्ब सापडले, असे पोलिसांनी सांगितले.

Updated: Mar 1, 2016, 12:34 AM IST
सुरक्षा दलाकडून पाच जिवंत बॉम्ब निकामी title=

जम्मू : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील मंडी परिसरातील अझमबाद गावात रविवारी पाच जिवंत बॉम्ब सापडले, असे पोलिसांनी सांगितले.

पुंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील अझमबाद गावात सुरक्षा दलांनी आज पाच जिवंत बॉम्ब निकामी केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

शुक्रवारी तहीर आणि वासीम ही दोन लहान मुले येथे खेळताना जखमी झाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी येथे शोध मोहीम सुरू केली होती. त्या वेळी त्यांना हे जिवंत बॉम्ब आढळले त्यानंतर त्यांनी ते निकामी केले. 

या परिसरात पाच जिवंत बॉम्ब आढळल्याने बॉंब निकामी पथकाने ते सुरक्षित स्थळी नेऊन निकामी केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सूत्रांनी सांगितले.