जयललितांच्या निधनाच्या धक्क्यानं 470 जणांचा मृत्यू

तामीळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे तामीळनाडू शोकसागरात बुडाला आहे.

Updated: Dec 12, 2016, 04:14 PM IST
जयललितांच्या निधनाच्या धक्क्यानं 470 जणांचा मृत्यू title=

चेन्नई : तामीळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे तामीळनाडू शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या निधनाच्या धक्क्याने आतापर्यंत 470 जणांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्या मृतांच्या वारसांना तीन लाखांची मदत देण्यात येणार आहे. एआयएडीएमके पक्षाच्या वतीने ही माहिती देण्यात आलीय.

कालपर्यंत हा आकडा 280 च्या घरात होता. दरम्यान, जयललिता यांची मैत्रिण शशीकला यांनी पक्षाची सूत्रं अधिकृतपणे स्वतःच्या हाती घेण्याची तयारी सुरू केली आहे. शशिकला यांनीच पक्षाची धुरा सांभाळावी, यासाठी पक्षातले ज्येष्ठ नेते आग्रही आहेत. त्यामुळं याबाबतची औपचारिकता लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.