३५ वर्षांच्या व्यक्तीनं केला ६ वर्षांच्या मुलीसोबत विवाह

राजस्थानच्या एका गावात ३५ वर्षीय व्यक्तीने ६ वर्षांच्या मुलीशी विवाह केल्याचं समोर आलंय. चितौडगड जिल्ह्यातील गंगरार गावी एका व्यक्तीने ६ वर्षांच्या एका मुलीशी बालविवाह केला आणि गावकऱ्यांना याची माहिती कळताच फरारही झालाय.

Updated: Jun 27, 2015, 04:18 PM IST
३५ वर्षांच्या व्यक्तीनं केला ६ वर्षांच्या मुलीसोबत विवाह title=

जयपूर : राजस्थानच्या एका गावात ३५ वर्षीय व्यक्तीने ६ वर्षांच्या मुलीशी विवाह केल्याचं समोर आलंय. चितौडगड जिल्ह्यातील गंगरार गावी एका व्यक्तीने ६ वर्षांच्या एका मुलीशी बालविवाह केला आणि गावकऱ्यांना याची माहिती कळताच फरारही झालाय.

 

रतन लाल जाट नावाच्या या व्यक्तीनं हा बालविवाह केला असून त्यासंबंधी चौकशीसाठी समितीही नेमण्यात आलीय. समितीचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर कारवाईही केली जाणार आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिलीय.

 

मुलीच्या परिवाराच्या उपस्थितीत हा विवाह झाला आहे. माहिती मिळताच तपास पथक घटनास्थळी पाठवण्यात आलं पण तोपर्यंत जाट फरार झाला होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.