नोटबंदीनंतर ३४ दिवसांत ३५ टक्के लोकांच्या नोक-या गेल्या - संस्था

नोटबंदी लागू झाल्यापासून 34 दिवसांत 35 टक्के लोकांच्या नोक-या गेल्या. महसुलातही पन्नास टक्क्यांनी घट झाली. हे आकडेवारी प्रसिद्ध केलीय ऑल इंडिया मॅन्युफॅक्चर्स ऑर्गनायझेशन या संस्थेनं. या 34 दिवसांत सुक्ष्म आणि लघु उद्योगांत काम करणा-या 35 टक्के लोकांच्या नोक-या गेल्या.

Updated: Jan 10, 2017, 11:47 AM IST
नोटबंदीनंतर ३४ दिवसांत ३५ टक्के लोकांच्या नोक-या गेल्या - संस्था title=

नवी दिल्ली : नोटबंदी लागू झाल्यापासून 34 दिवसांत 35 टक्के लोकांच्या नोक-या गेल्या. महसुलातही पन्नास टक्क्यांनी घट झाली. हे आकडेवारी प्रसिद्ध केलीय ऑल इंडिया मॅन्युफॅक्चर्स ऑर्गनायझेशन या संस्थेनं. या 34 दिवसांत सुक्ष्म आणि लघु उद्योगांत काम करणा-या 35 टक्के लोकांच्या नोक-या गेल्या.

संस्थेनं मार्च 2017 पर्यंत 60 टक्के नोक-या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. शिवाय महसुलातही 55 टक्के घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. मॅन्युफॅक्टरिंग अंतर्गत निर्यातीशी संबंधित सुमारे 3 लाख सुक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे उद्योग येतात. यात आणखी एक निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. या काळात सर्वच उद्योगांमध्ये ब्रेक लागल्याचं पहायला मिळालं. पण नोटाबंदीचा सर्वात जास्त परिणाम लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये जाणवला. नोटाबंदीच्या परिणामांचा ऑल इंडिया मॅन्युफॅक्चर्स ऑर्गनायझेशनचा हा तिसरा अभ्सास आहे. लवकरच चौथा अहवालही संस्था प्रसिद्ध करणार आहे.