खूशखबर : रेल्वे प्रवाशांसाठी नव्या ३ सेवांचा शुभारंभ

रेल्वेमंत्री यांनी रेल्वे प्रवाशांसाठी ३ नव्या सेवा सुरू केल्या आहेत.

Updated: Feb 12, 2016, 02:16 PM IST
खूशखबर : रेल्वे प्रवाशांसाठी नव्या ३ सेवांचा शुभारंभ title=

नवी दिल्ली : रेल्वेमंत्री यांनी रेल्वे प्रवाशांसाठी ३ नव्या सेवा सुरू केल्या आहेत. टीसी आणि प्रवाशांमध्ये नेहमी वाद होत असतात. त्यामुळे आता हे वाद रोखण्यासाठी उपाय शोधून काढला आहे. यामुळे तिकीट चेंकीगमध्ये पारदर्शकता येणार आहे.

टीसीला आता चार्ट घेऊन फिरावं लागणार नाही. सगळी यादी आता ऑनलाईन मिळणार आहे. प्रवाशी जर कोणत्याही कारणामुळे प्रवास करू नाही शकला किंवा त्याने रिझरवेशन कॅन्सल केलं तर त्यामुळे त्या सीटवर टीसी त्याच्या मनाने कोणताही प्रवाशाला देऊ शकणार नाही. त्यानंतर ती माहिती ऑनलाईन पद्धतीने पुढच्या स्टेशनला पोहोचेल आणि वेटींगमध्ये असलेल्या प्रवाशांचं तिकीट कन्फर्म होणार आहे. यामुळे टीसींना कोणताही काळा कारभार करता येणार नाही. 

रेल्वे प्रवाशांसाठी ई-बेडरोल सेवा सुद्धा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये प्रवाशी १४० रुपयात २ बेडशीट आणि एक उशी घेऊ शकता. ई-तिकीट कन्फर्म झालेल्या प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

पेपरलेस तिकीटसाठी आता मोबाईल तिकीट सेवा रेल्वे मंत्रालयाकडून सुरू करण्यात आली आहे. एका अॅपद्वारे तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट देखील मिळवू शकता. 

पाहा व्हिडिओ