नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर बँक तसेच एटीएमसमोर लोकांच्या मोठ्या रांगा आहेत. यातच 31 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा जमा करण्याची मुदत असल्याने अनेकजण काळा पैसा पांढरा करण्याच्या मागे लागलेत. मात्र यावर सरकारची कडी नजर आहे.
यानोटाबंदीदरम्यान बँकेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 27 बँक अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीये. तर 6 जणांची बदली करण्यात आलीये. आठ नोव्हेंबरनंतर ही कारवाई करण्यात आलीये.
अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की आठ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर अशी अनेक प्रकरणे समोर आलीये ज्यामध्ये आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन झालेय.
मंत्रालयाकडून हे स्पष्ट कऱण्यात आलेय की कायद्यानुसार पैशांचे देण्याघेण्याचे व्यवहार होऊ शकतात मात्र गैर पद्धतीने कोणी असे व्यवहार करत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल.