'बीबीसी'कडून लंडनमध्ये 'निर्भया'वरील डॉक्युमेंट्रीचं प्रसारण

'बीबीसी'ने दिल्लीतील निर्भयावरील बलात्कारावर तयार करण्यात आलेली इंडियाज डॉटर ही डॉक्युमेंट्री प्रसारीत केली आहे. ही डॉक्युमेंट्री प्रसारीत करू नये, असा इशारा भारत सरकारने दिल्यानंतरही बीबीसीने आज लंडनमध्ये या डॉक्युमेंट्रीचं प्रसारण केलं. 

Updated: Mar 5, 2015, 12:42 PM IST
'बीबीसी'कडून लंडनमध्ये 'निर्भया'वरील डॉक्युमेंट्रीचं प्रसारण title=

मुंबई : 'बीबीसी'ने दिल्लीतील निर्भयावरील बलात्कारावर तयार करण्यात आलेली इंडियाज डॉटर ही डॉक्युमेंट्री प्रसारीत केली आहे. ही डॉक्युमेंट्री प्रसारीत करू नये, असा इशारा भारत सरकारने दिल्यानंतरही बीबीसीने आज लंडनमध्ये या डॉक्युमेंट्रीचं प्रसारण केलं. 

महिला दिनाच्या दिवशी ही डॉक्युमेंट्री प्रसारीत करणार असल्याचं बीबीसीने सांगितलं होतं, मात्र त्यांनी आजच लंडनमध्ये ही डॉक्युमेंट्री प्रसारीत केली.

या बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेश याने तिहार जेलमधून या डॉक्युमेंट्रीसाठी मुलाखत दिली आहे. ही मुलाखतीची परवानगी कुणी दिली हा प्रश्न उपस्थित राहतोय. या मुलाखतीला परवानगी देण्यात आली असली, तरी मुलाखतीनंतर फुटेज का तपासण्यात आलं नाही, हा देखिल प्रश्न आहे.

यानंतर मुकशेच्या या मानसिकेतेवरून अनेकांनी निषेध केला आहे. राज्यसभेतही मुकेशच्या मानसिकतेवर गदारोळ झाला. ही डॉक्युमेंट्री भारतात प्रसारीत करणार नसल्याचं बीबीसीने म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.