बिलासपूर: छत्तीसगढमधील बिलासपूर येथे 200 किलो शुध्द तुपाची सुंदर गणेशमूर्ती बनवण्यात आलीये. ही मूर्ती 8 फूट उंच आणि 5 फूट रुंद आहे.
ही गणेशमूर्ती वितळू नये म्हणून तिला सतत एसीत आणि काचेच्या पेटीत ठेवण्यात येणार आहे. गणेश उत्सव दरम्यान ही मूर्ती 16 अंश सेल्सिअस तापमानात ठेवण्याची मोठी जबाबदारी आयोजकांवर आहे.
ही मूर्ती 100 किलो वनस्पती तूप आणि 100 किलो शुध्द तुपाने बनवली आहे. या मूर्तीसाठी नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात आलाय. तसेच या गणपतीची श्रृंगाराची सर्व सामाग्री पर्यावरणपूरक आहे. यासाठी एकूण सहा लाख रुपये खर्च आला आहे.