सर्जिकल स्ट्राईक : बर्गरवर मिळणार २० टक्के सूट

इंडियन आर्मीने पाकिस्तान व्याप्त काश्मिरात जाऊन सर्जिकल स्ट्राईक केली, याचा आंनदोत्सव देशभरात सुरू आहे.

Updated: Sep 29, 2016, 11:50 PM IST
सर्जिकल स्ट्राईक : बर्गरवर मिळणार २० टक्के सूट title=

नवी दिल्ली : इंडियन आर्मीने पाकिस्तान व्याप्त काश्मिरात जाऊन सर्जिकल स्ट्राईक केली, याचा आंनदोत्सव देशभरात सुरू आहे.

मात्र एका ऑनलाईन बर्गर कंपनीने, वेगळ्या पद्धतीने हा आनंद साजरा केला आहे, बर्गर सिंग या ऑनलाईन डिलेवरी बर्गर कंपनीने ग्राहकांना २० टक्के सूट देण्यास सुरूवात केली आहे.

बर्गर सिंह नावाच्या ऑनलाईन वेबसाईटने ही ऑफर आपल्या ग्राहकांना दिली आहे, ही ऑफर किती दिवस सुरू असेल हे नक्की सांगण्यात आलेले नाही.