हंदवाडामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीरच्या हंदवाडामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. 

Updated: May 14, 2017, 09:31 PM IST
हंदवाडामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान title=

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या हंदवाडामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. 

हंदवाडामधील वारीपोर परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने परिसराला घेराव घालून शोधमोहिम हाती घेतली. 

यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षा दलानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. सुरक्षा दलाच्या या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. 

गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झालीय. याच पार्श्वभूमीवर सुरक्षा दलानं केलेली कारवाई महत्त्वाची समजली जातेय.