'सुनंदाच्या मृतदेहावरील १५ जखमा मारहाणीच्या'

माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी वेगवेगळे खुलासे सध्या बाहेर पडतायत. सुनंदा यांच्या मृत्यू प्रकरणी एम्सचा अंतिम मेडिकल रिपोर्ट जाहीर करण्यात आलाय. यामध्ये, सुनंदा यांचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाला असल्याचं म्हटलं गेलंय. इतकंच नाही तर, त्यांनी हे स्वत:हून घेतलं असावं किंवा इंजेक्शनच्या साहाय्याने यांच्या शरीरात पोहचवलं गेल्याची शंका व्यक्त केलीय. 

Updated: Jan 9, 2015, 11:10 AM IST
'सुनंदाच्या मृतदेहावरील १५ जखमा मारहाणीच्या' title=

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी वेगवेगळे खुलासे सध्या बाहेर पडतायत. सुनंदा यांच्या मृत्यू प्रकरणी एम्सचा अंतिम मेडिकल रिपोर्ट जाहीर करण्यात आलाय. यामध्ये, सुनंदा यांचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाला असल्याचं म्हटलं गेलंय. इतकंच नाही तर, त्यांनी हे स्वत:हून घेतलं असावं किंवा इंजेक्शनच्या साहाय्याने यांच्या शरीरात पोहचवलं गेल्याची शंका व्यक्त केलीय. 

धक्कादायक म्हणजे, मृत्यूच्या वेळी सुनंदा पुष्कर यांच्या शरीरावर आढळलेल्या जखमांपैकी एक जखम सोडून बाकी साऱ्या जखमा हाणामारीमुळे झाल्या असल्याचं स्पष्टपणे म्हटलं गेलंय. सुनंदा पुष्कर यांच्या शरीरावर एकूण १६ जखमा आढळल्या होत्या... त्यापैंकी,१५ जखमा बल प्रयोगामुळे झाल्याचं म्हटलं गेलंय. तसंच, एक जखम ही दातांची चावल्यामुळेही झाली होती.... मृत्यूपूर्वीच्या चार दिवसांमध्ये या सगळ्या जखमा सुनंदा पुष्कर यांच्या शरीरावर झाल्या होत्या.

ऑटोप्सी बोर्डानं २९ डिसेंबर रोजी पोलिसांकडे सोपवलेल्या आपल्या अंतिम रिपोर्टमध्ये, हा प्राकृतिक मृत्यू नसल्याचं आणि विष तोंडाद्वारे किंवा इंजेक्शनद्वारे शरीरात पोहचवलं गेल्याचं म्हटंलय. प्राथमिकीनुसार, नवी दिल्लीच्या एम्समध्ये १८ जानेवारी रोजी मृतदेहाचा पोस्टमार्टम तीन फॉरेन्सिक डॉक्टरांच्या ऑपोप्सी बोर्डानं केला होता. 

सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू १७ जानेवारी, २०१४ रोजी दिल्लीच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झाला होता. सर्वात प्रथम सरोजिनी नगर पोलीस स्टेशनमध्ये तत्कालीन प्रभारी अतुल सूद यांच्याकडे शशी थरूर यांचा खाजगी सचिव अभिनव कुमार यानं फोन करून या घटनेची माहिती दिली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.