१३ साहित्यिकांनी परत केला साहित्य अकादमी पुरस्कार

 देशात बिघडलेला जातीय सलोखा आणि साहित्यिक-विचारवंतांच्या हत्येच्या निषेधार्थ आतापर्यंत 13 साहित्यिकांनी आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत केलाय... साहित्यिकांचा हा रोष कसा थांबवावा, असा पेच आता मोदी सरकारला पडलाय...

Updated: Oct 12, 2015, 07:41 PM IST
१३ साहित्यिकांनी परत केला साहित्य अकादमी पुरस्कार  title=

नवी दिल्ली :  देशात बिघडलेला जातीय सलोखा आणि साहित्यिक-विचारवंतांच्या हत्येच्या निषेधार्थ आतापर्यंत 13 साहित्यिकांनी आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत केलाय... साहित्यिकांचा हा रोष कसा थांबवावा, असा पेच आता मोदी सरकारला पडलाय...

 
भारतीय सारस्वतांनी सध्या मोदी सरकारविरोधात एल्गार पुकारलाय... साहित्यिक एम. एम. कलबुर्गी, विचारवंत कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या तसंच वाढत्या हिंसाचारी घटनांच्या विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी त्यांनी हत्यार उपसलंय... ते निषेधाचं... सरकारच्या कथित नाकर्तेपणाच्या विरोधात आतापर्यंत विविध भाषिक साहित्यिकांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केलेत...

कोण आहेत ते 
'मोहनदास'ची निर्मिती करणारे हिंदी साहित्यिक उदय प्रकाश,
'रिच लाइक अस' कादंबरीच्या लेखिका आणि पंडित नेहरूंच्या पुतणी नयनतारा सहगल,
'कही नही वही'चे रचनाकार ज्येष्ठ हिंदी कवी अशोक वाजपेयी,
'आल्हायुदे पेनमक्कल'कार मल्याळी साहित्यिका सारा जोसेफ,
'आफ्टर एम्नेशिया'कार ज्येष्ठ भाषा शास्त्रज्ञ गणेश देवी,
गुरूबचन भुल्लर, अजमेर सिंह औलाख, आत्मजीत सिंह, मंगेश डबराल, राजेश जोशी, एन. शिवदास, कुम वीरभद्रप्पा, वरीयम सिंह संधू आदी साहित्यिकांचा त्यात समावेश आहे.
तर 'दॅट लाँग सायलेन्स'च्या लेखिका शशी देशपांडे,
'मरन्नु वेचा वास्थूकल'चे रचनाकार मल्याळी कवी के. सच्चिदानंदन आणि अरविंद मलगट्टी यांनी साहित्य अकादमीतल्या आपल्या पदांचे राजीनामे दिलेत.

मात्र साहित्यिकांचा विरोधाचा हा मार्ग योग्य नसल्याचं साहित्य अकादमी अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, काँग्रेस सरकारच्या काळात देशात जातीय दंगे होत असताना आणि दाभोलकर, पानसरेंसारख्या पुरोगाम्यांच्या हत्या झाल्यानंतर ही साहित्यिक मंडळी गप्प का होती? एफटीआयआयच्या आंदोलनानंतर मोदी सरकारविरोधातली साहित्यिकांची मोर्चेबांधणी हे बंड आहे की यामागंही राजकारण आहे?, असे सवाल आता उपस्थित होतायत...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.